Crime News : साडेदहा लाखांच्या अवैध गुटख्यासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पुण्यात दोघांना साडेदहा लाखांच्या गुटख्यासह अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पुणे आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने गंज पेठ येथे केली.

खाँजा ऊर्फ साहिल असलम मुलाणी (वय 20 गंज पेठ) व शादाब मुशताक नाईकवाडी (वय 24 रा.गंज पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना खबर मिळाली की, गंज पेठ येथील मुलाणी याच्याकडे अवैध गुटखा साठा आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पोलिसांनी नुर केटरर्स येथे छापा मारला त्यावेळी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. यावेळी दुकानाची झडती घेतली असता तेथे गुटख्याच्या पाकीटांनी भरेलेले बारदान पोत्यात भरून ठेवले होते.पंचासमक्ष मोजणी केली असता पोत्यात 10 लाख 56 हजार 640 रुपयांचा विमल गुटखा मिळून आला.खडक पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणी विरोधी पथखाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील हे पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.