Khadakwasla Dam : खडकवासला धरणात दोन महाविद्यालयीन तरुण बुडाले

एमपीसी न्यूज : पुणे पानशेत रस्त्यावरील सोनापूर गावच्या हद्दीत खडकवासला (Khadakwasla Dam) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडाल्याने दूर महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. फरहान अलीम शेख (वय 18) आणि साहिल विलास ठाकर (वय 19) अशी बुडून मृत्यू पडलेल्या या तरुणांची नावे आहेत. दोघेही पुण्याच्या कोथरूड परिसरातले रहिवाशी होते.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सोनापूर गावाच्या हद्दीतील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोथरूड येथील पाच तरुण पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास यातील फरहान आणि साहिल असे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहोता येत नसल्यामुळे काही क्षणातच हे दोन तरुण बुडाले. दरम्यान आपले मित्र बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यासोबत असणाऱ्या इतरांनी आरडाओरडा केला. घटनास्थळी दाखल झालेल्या स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी शोध (Khadakwasla Dam) मोहीम राबवत पाण्यात बुडालेल्या या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.

Pune Bye-Election : अजित पवारांच्या रॅलीत एकनाथ शिंदे यांचे गाणे; वैतागलेले अजित दादा गाडीतून उतरले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.