Pune : महावितरणच्या अभियंत्यासह खासगी इसमास 25,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी 

एमपीसी न्यूज – हॉटेलचे वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिरूर तालुक्याच्या रांजणगाव विभागातील महावितरणच्या अभियंत्यासह खासगी इसमास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संतोष पंचरास असे या अधिका-याचे नाव असून दीपक गव्हाणे या खासगी सहाय्यकाचे नाव आहे.

तक्रारदाराचे हॉटेल चालविण्यास घेतले असून त्याचे वीज कनेक्शन जोडून देण्यासाठी तसेच वीज मीटर तक्रारदार यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी महावितरणचा अधिकारी पंचरास याने तक्रारदाराला 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाने तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली असता पंचरास यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार दोघांना अटक करून रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता विशेष न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक प्रतिभा शेंडगे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.