Pune Crime News : अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी आणखी दोन बालकांना घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – मोशी येथील अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात (Pune Crime News)  घेतले, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.एस.पांचाळ यांनी दिली.

 

मंगळवारी दुपारी या खून प्रकरणी तीन विधीसंघर्षीत अल्पवयीन मुलांना (Pune Crime News)  ताब्यात घेण्यात आले.त्यामुळे आता या प्रकरणी एकूण पाच मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यामुळे अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

Pimpri Chinchwad Police : गाडीत अंमली पदार्थ पकडणाऱ्या दोन पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न असफल

 

सुमित बनसोडे (वय15) या अल्पवयीन मुलाचा खून झाला होता.सुमितला कोणी तरी राहत्या घरातून फुस लावून प्रथम पळवून नेले व नंतर त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासा दरम्यान पाच मित्रांनी सुमितचा धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करुन खून केल्याचे निष्पन्न झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.