Talegaon Accident News : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तळेगाव स्टेशन रस्त्यावरील घटना

एमपीसी न्यूज – टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. चाकण तळेगाव रस्त्यावर, तळेगाव रेल्वे स्टेशन येथे सोमवारी (दि.11) ही घटना घडली.

महेश मनमत मजगे (वय 36, रा. तळेगाव दाभाडे) असे या अपघातात मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत अभिजीत शिवमुर्ती मजगे (वय 44, रा. शेरगाव) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महेश हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 जीएम 2064) चाकणच्या दिशेने जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो चालकाने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात महेश गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. तसेच, दुचाकीचेही नुकसान झाले. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.