Pune : धोरण मंजूर होईपर्यंत खासगी कंपन्यांच्या रस्ते खोदाईला ‘फुलस्टॉप’ 

एमपीसी न्यूज – रस्तेखोदाई नियमावली धोरणाला मान्यता होईपर्यंत ओ. एफ. सी. खासगी कंपन्यांना परवानगी देऊ नये. मात्र, शासकीय संस्था, संरक्षण खाते आणि नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी मागणी केलेल्या खोदाई करण्याची परवानी देण्याचा निर्णय शहर सुधारणा समितीने घेतला आहे. पालिकेच्या पथ विभागाने रस्तेखोदाई नियमावली तयार केली आहे. त्यावर शहर सुधारणाच्या बैठकीत चर्चा झाली असून, डक्टचा विषय प्रलंबित आहे. मात्र, पालिकेकडे विविध कंपन्यांनी रस्ते खोदाई करण्यासाठी परवानगी मागितली आहे. 

त्यावर शहर सुधारणा समितीने एक उपसूचना देऊन ठराव केला. त्यात रस्तेखोदाई नियमावली धोरणाला मान्यता होईपर्यंत आय. एस. पी. लायसेन्स प्राप्त ओ. एफ. सी. कंपन्यांना परवागनी देऊ नये. मात्र, शासकीय संस्था, एसएनजीएल, एमएसईडीसीएल, बीएसएनएल, संरक्षण खाते आणि नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी मागणी केलेल्या खोदाई करण्याची परवानी देण्याचा निर्णय शहर सुधारणा समितीने घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.