Pimpri : जनतेच्या योजना त्यांच्या दारापर्यंत नेण्याचा उपक्रम स्तुत्य – खासदार बारणे

एमपीसी न्यूज – सर्व सामान्य जनतेच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्या दारापर्यंत नेऊन त्या मार्गी लावण्याचा आमदारांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी आज येथे केले. 

‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी मोहननगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह, राज्याच्या तसेच महापालिकेच्या योजनांची प्रक्रिया एकाच दिवशी अर्ज स्वीकारून एकाच दिवशी मार्गी लावण्यासाठी शासकीय यंत्रणाचे सर्व विभाग यावेळी एकत्र आले होते.

बारणे पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण आमदार चाबुकस्वार यांनी आपल्या समाजोपयोगी कार्यातून दाखवून दिले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जनतेसाठी अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊन जाण्याची क्षमता व त्यांच्यामध्ये मिसळण्याची कामकाज पद्धती फक्त शिवसेनेत असल्याचे त्यांनी म्हटले.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख सरिता साने, नगरसेवक प्रमोद कुटे, मीनल यादव, विभाग प्रमुख नाना काळभोर, संजय गांधी योजनेच्या तहसिलदार राधिका हवाळ, हवेलीचे नायब तहसिलदार संजय भोसले, परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे, महसूल विभागाचे मंडलाधिकारी शेखर शिंदे, तसेच पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडीचे तलाठी आदी उपस्थित होते. संजय गांधी योजनेचे सदस्य उत्तम कुटे, राजू दुर्गे, सारिका तामचीकर, संभाजी सुर्यवंशी यांनी संयोजनात सहभाग घेतला. आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी या उपक्रमामागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय गांधी योजनेचे सदस्य उत्तम कुटे यांनी केले तर नगरसेविका मीनल यादव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.