Rajya Sabha Election 2022 : वडगाव भाजपाकडून राज्यसभेतील विजय साजरा

एमपीसी न्यूज – राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) भाजपाला तीन जागांवर विजय मिळाला. भाजपाच्या वतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर बहुमताने निवड झाली. वडगाव शहर भाजपाने हा विजय पेढे वाटून आणि फटाके वाजवून साजरा केला.

याप्रसंगी जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, नगरसेवक प्रविण चव्हाण, ॲड.विजय जाधव, नारायण ढोरे, सुधाकर ढोरे, सोमनाथ काळे,पंढरीनाथ भिलारे,प्रसाद पिंगळे, भूषण मुथा,प्रमोद म्हाळसकर, किसनराव वाघवले,विठ्ठलराव घारे,नाथा घुले, श्रीधर चव्हाण,संतोष म्हाळसकर, नितीन गाडे, वसंत भिलारे, प्रज्योत म्हाळसकर, महेंद्र म्हाळसकर, विकी म्हाळसकर व वडगाव शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Ramdas Vadekar : मावळ तालुका राष्ट्रवादी संघटन सरचिटणीसपदी रामदास वाडेकर यांची निवड

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी ही आगामी निवडणुकीची (Rajya Sabha Election 2022) विजयाची नांदी आहे. हा विजय आमदार लक्ष्मण जगताप व आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी केले, तर युवामोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.