MP Sanjay Raut : ….तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील; संजय राऊत यांचा खोचक टोला

एमपीसी न्यूज – राज्यसभा निवडणूक 2022 च्या निकालात अखेर भाजपने आपली विजयी पताका फडकवली. एक मत बाद झाल्याने शिवसेनेला यावेळी शह मिळाला. निवडणुकीतील या नाट्यमय घडमोडीनंतर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया नोंदवली. आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील अशा शब्दांत राऊत यांनी यावेळी खोचक टोला लगावला.

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी (दि. 10 जून) मतदान घेण्यात आले. यातील सहाव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच चुरस रंगल्याचे पाहायला मिळाले. मतदानाच्या वेळी आरोप – प्रत्यारोपाचा खेळ रंगला त्यामुळे मतदान निकालसाठी वेळ लागला, परंतु या निवडणुकीत महाविकास आघाडीला मात देत या विजयावर भाजपनेच नाव कोरले.

Rajya Sabha Election 2022 : वडगाव भाजपाकडून राज्यसभेतील विजय साजरा

भाजपच्या यशानंतर माध्यमांनी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी खा. राऊत म्हणाले, आमच्या हातात ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील. आम्हाला काय म्हणायचंय हे अपक्षांना माहित आहे. इथे कोणत्या पक्षांचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, असे म्हणत खा. राऊत यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

दरम्यान पंकजा मुंडे यांना डावलल्याचे सांगत खा. राऊत म्हणाले, पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे. आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे. पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असे म्हणून अनेक वगळल्या गेलेल्या मुद्द्यांना अनुसरून संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यसभा निवडणुकीचा कौल यावेळी भाजपच्या बाजूने लागला, त्यामुळे या निकालाचे सर्व श्रेय विरोधकांनी पिंपरी – चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना यावेळी दिले. दरम्यान, राज्यात भाजपला विजय मिळाल्याने यापुढे राज्यातील समीकरणे कशा पद्धतीने हालणार हे पाहणे या निमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.