Cyber Crime : शहरात आर्थिक फसवणूक, खंडणी गुन्ह्यांमध्ये वाढ, सायबर गुन्हेगारांचे सरकारी यंत्रणांना खुले आव्हान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये 15000 पेक्षा जास्त आर्थिक फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले असून इन्स्टंट लोन फसवणूकीचे 2000 प्रकार सायबर सेल (Cyber Crime) कडे नोंदवले गेल्याचे सांगत तपास मात्र कासव गतीने सुरू असल्याचा आरोप प्राधिकरण नागरी सुरक्षा संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केला. सायबर गुन्हेगार सरकारी यंत्रणांना खुले आव्हान देत असल्याचेही ते म्हणाले.

विजय पाटील यांनी या संदर्भात पिंपरी-चिंचवड शहरातील सायबर क्राइम (Cyber Crime) कार्यालयात गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.संजय डी.तुंगार यांची भेट घेतली. प्रकरणाबाबत लेखी तक्रार 6 जून 2022 रोजी दाखल केली. पाटील म्हणाले, राज्यात कोरोना महामारीनंतर अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेकजण कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

MP Sanjay Raut : ….तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील; संजय राऊत यांचा खोचक टोला

तात्काळ लोन मिळवण्यासाठी तरुण तरुणी “गुगल अॅप ” वर उपलब्ध असणाऱ्या विविध अँप्स चा सहारा घेत आहेत आणि नेमकी इथूनच त्यांचा घात होण्यास सुरुवात होते. गरजू नागरिक ” हॅण्डी लोण”, “इन्स्टंट लोण” सारखी ऍप्स डाऊनलोड करतात आणि लोनचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीच्या जाळ्यात अलगद फसतात, सुरुवातीला काही रुपयांचे ते आमिषही देतात नंतर मात्र त्या व्यक्तीला ते भरमसाठ व्याज आकारून वसुली सुरू करतात.

तसेच तुमच्या मोबाईलचा संपूर्ण डेटा हॅक झाल्याचे, मोबाईल मधील संपूर्ण कॉन्टॅक्ट लिस्ट, ओळखपत्रे हॅक झाल्याचे ते मेसेज पाठवतात व ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करतात ह्यासाठी ते क्लोन सिमकार्ड व विविध यूपीआय आयडीचा ते वापर करतात. त्यामुळे खंडणी वसूल करताना सायबर पोलिसांना व तपास यंत्रणांना “तुरी” देण्यास ते यशस्वी ठरतात.

अशा पद्धतीने फसलेल्या व्यक्तींना बलत्कार केल्याचे व पॉर्न व्हिडीओ चे मेसेजेस तुमच्या परिसरात पसरवण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी वसूल करतात, बदनामीची भीती आणि सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळण्याच्या भीतीने अनेक जण त्यांच्या मागण्या पूर्ण करतात. दिवसेंदिवस अशा घटना संपूर्ण देशात वाढत असून भारत सरकार, पोलीस यंत्रणा, भारतीय रिझर्व्ह बँक सुद्धा ह्यावरती नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

त्यामुळे सायबर गुन्हेगार (Cyber Crime) मुजोर झाले असून दररोज हजारो नागरिकांची फसवणूक करण्याचा गोरखधंदा बिनधास्तपणे विनाअडथळा सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातील पंतप्रधान पदासारख्या महत्त्वपूर्ण स्थानाची बदनामी करून कशाप्रकारे देशाची प्रतिमा मलिन करण्याचे कृत्य हे गुन्हेगार बेधडकपणे करत आहेत हे सुद्धा पाटील यांनी तक्रारींमध्ये नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.