Vadgaon Maval : बाफना डी. एड. कॉलेजमध्ये स्वच्छता अभियानाअंतर्गत प्रभात फेरी

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील बाफना डी एड कॉलेजच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमाअंतर्गत वडगाव शहरातून प्रभात फेरी काढली.

विविध बोधवाक्ये असलेल्या फलकांच्या साहाय्याने नागरिकांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. यावेळी प्राचार्य हिरामण लंघे, प्रा. राजेंद्र डोके, प्रा मनोज गायकवाड, प्रा. शुभांगी हेंद्रे, प्रा. शीतल गवई तसेच सेवक सोमनाथ धोंगडे उपस्थित होते. संस्थेचे सचिव अशोक बाफना व अध्यक्ष तुकाराम आसवले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<