Hinjawadi : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक; दोन पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

सागर कुमार इंद्रा (वय 27, रा. देहूगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक आतिफ रफिक शेख यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी सागर याला अटक केली. त्याच्याकडून 50 हजार 400 रुपये किमतीचे दोन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे तसेच 50 हजार रुपयांची एक मोटारसायकल असा एकूण 1 लाख 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्याच्यावर हत्यार कायद्यासह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.