Vadgaon Maval : ‘लाॅकडाऊन’च्या कालावधीत शेतकऱ्यांना ‘पास’ देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – देशात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये; म्हणून 14 तारखेपर्यंत संचारबंदी असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ‘कोरोना’च्या या महामारीला देशातून हद्दपार करण्यासाठी सर्वच स्थरावर प्रयत्न चालू आहेत. या ‘लाॅकडाऊन’च्या कालावधीत शेतकऱ्यांना पास देण्याची मागणी करण्यात येत आहे. 

कंपन्या, आयटी पार्क, उद्योगधंदे जरी बंद आहेत, असे असले तरी शेतकरी याला अपवाद आहे. कारण शेतकरी थांबला तर लोकांना आवश्यक भाजीपाला आणि अन्नधान्य मिळणार नाही.

सध्या मावळात ऊसतोड झाली असून ऊसाला खत देणे, फोडणी करणे, पाणी देणे, तसेच ज्वारी काढणे, तरकारीची तोडणी करणे आदी कामे करणे बाकी आहे. परंतु लाॅकडाऊनमुळे कडक बंदोबस्त असल्यामुळे शेतकरी बाहेर पडायला धास्तावले आहेत. परिणामी पिके वाळू लागली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेती दुसऱ्या गावात असल्यामुळे शेतावर जाताही येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

तरी ज्यांची शेती दुसऱ्या गावात दुरवर असल्याने शेतावर जायला प्रतिबंध होतो.अशा शेतकऱ्यांना संचार करण्यास पास देण्यात यावा. अशी मागणी वडगावचे शेतकरी तुषार वहिले, सचिन कराळे, सौरभ सावले, सुधीर वहिले आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.