Vadgaon Maval : किल्ले बनवा स्पर्धेतील स्पर्धकांनी दिली किल्ले शिवनेरीला भेट

एमपीसी न्यूज- स्व.पै.पंढरीनाथ हरिभाऊ सातकर प्रतिष्ठान,मावळ यांच्या वतीने दिवाळीचे औचित्य साधून कान्हे येथे किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील स्पर्धकांसाठी शिवनेरी गडाची सहल आयोजित करण्यात आली.

या स्पर्धेमध्ये मोठया संख्येने किल्लेप्रेमीनी सहभाग घेतला. स्पर्धेतील सर्वच स्पर्धकांनी महाराष्ट्रातील विविध किल्ल्याचे उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केले होते. सहलीच्या दिवशी सकाळी कान्हे येथे शुभेच्छा देण्यासाठी कान्हेगावचे उपसरपंच पै किशोर सातकर, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ सातकर, पंढरीनाथ सातकर, लक्ष्मण सातकर, गुलाब सातकर, विजय, अशोकराव सातकर, विठ्ठलराव शिंदे, अप्पासाहेब जवळकर, मारुती डेनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम किल्ले शिवनेरी येथे पार पडला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास सातकर, खजिनदार अमोल सातकर,उपाध्यक्ष प्रसाद सातकर, कार्याध्यक्ष शशिकांत ओव्हाळ, सचिव चेतन थोरवे, सचिन सातकर, भरत सातकर, सनी सातकर, सागर सातकर, अक्षय सातकर, नवनाथ सातकर, ऋषी सातकर, हेमंत सातकर, आकाश सातकर, प्रतीक सातकर, बबन भांगरे, विजय केदारी, सुनील शिरसट, सोमनाथ भोसले, योगेश कुटे, शशांक सातकर, अभिषेक सातकर व प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुशांत बालगुडे यांनी केले तर आभार शशिकांत ओव्हाळ यांनी मानले. किल्ल्यांचे पर्यवेक्षक म्हणून मनोज भांगरे, अंकुश ढोरे, सखाराम आलम यांनी जबाबदारी पार पडली.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

लहान गट-
प्रथम क्रमांक कु. ओम सातकर,
द्वितीय क्रमांक- KTM ग्रुप
तृतीय क्रमांक- शिवगर्जना ग्रुप

खुला गट-
प्रथम क्रमांक- काळेश्वरी ग्रुप,
द्वितीय क्रमांक- ओंकारेश्वर मित्र मंडळ
तृतीय क्रमांक- धम्मदीप मित्र मंडळ आणि जाणता राजा मित्र मंडळ (विभागून)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.