Vadgaon Maval News: जागतिक टपाल दिनानिमित्त महिला पोस्टमनचा सत्कार 

एमपीसी न्यूज – जागतिक टपाल दिनानिमित्त आमदार रोहितदादा पवार फॅन्स क्लबच्या वतीने महिला पोस्टमनचा विशेष सत्कार करण्यात आला.

जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून संदेशवहनाचे महत्वाचे काम करून  वडगाव मावळ शहरात महिला पोस्टमन म्हणून नोकरी करणा-या इंदोरी येथील सुशीला सुदाम नाटक यांचा सत्कार आमदार रोहितदादा फॅन्स क्लबच्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी आमदार रोहित दादा फॅन्स क्लबचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वहिले, मावळ तालुका ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी मंगेश खैरे, युवा कार्यकर्ते स्वप्नील वाघमारे, संतोष देशमुख आदी उपस्थित होते.

टपाल खात्याला अनेक वर्षांचा इतिहास आहे. नागरिकांचे संदेश पोहोचविण्याचे कार्य इंटरनेटच्या युगातही टपाल खात्याकडून अविरत चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.