Vadgaon Maval: मानाची दगडी गोटी उचलणे स्पर्धेत नितीन म्हाळसकर चांदीच्या कड्याचे मानकरी!

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ शिवजयंती उत्सव समितीने धुळवड सणानिमित्त आज (मंगळवारी) आयोजित केलेल्या व जय बजरंग तालीम मंडळाने संयोजन केलेल्या शिवकालीन मर्दानी खेळात मानाची दगडी गोटी उचलणे स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन वसंतराव म्हाळसकर यांनी 180 बैठका मारून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या मानाचे चांदीच्या कड्याचा मान मिळवला.

प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत मानाच्या दगडी गोठींचे पूजन करण्यात आले.  यावेळी श्रीमंत सरदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज श्री.समीरसिंहदादा जाधवराव, गणेश आप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांक पटकावून विजयी झालेल्या नितीन म्हाळसकर यांना मानाचे चांदीचे कडे देण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय महिला खेळाडू हर्षदा गरुड हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने वडगावकर ग्रामस्थ तसेच खेळाडू उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.