Vadgaon Maval: कोरोना जनजागृतीसाठी एलईडी स्क्रीनचा वापर

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल चंद्रकांत राऊत तसेच एआर ग्रुप, बालविकास मित्र मंडळ यांचे वतीने कोरोना या विषाणूपासून सावधानता बाळगण्यासाठी व विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वडगाव मावळ येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची पंचसूत्र सांगण्यासाठी व्हिडिओ एलईडी स्क्रीनवर माहिती देऊन जनजागृती अभियान करण्यास सुरुवात केली. 

याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकतें पंडितराव (अण्णा) जाधव, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष अरुण वाघमारे, किरण देवघरे, राजेंद्र राऊत, शांती कोठारी, विशाल सुराणा, प्रसाद देवघरे, अवधूत गायकवाड, प्रथमेश घाग, सुमेध म्हाळस्कर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.