kinara Vruddhashram : किनारा वृद्धाश्रमातील वृद्धांची दिवाळी उत्साहात

एमपीसी न्यूज – अहिरवडे येथील किनारा वृध्दाश्रमात (kinara Vruddhashram) ज्येष्ठ नागरीक व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिवाळीचे औचित्य साधत वसुबारसेला दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. वडगांव मावळ येथील सुप्रसिध्द लाँड्री व्यावसायिक राजेंद्र राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसमवेत वृध्दाश्रमातील वृध्दांशी संवाद साधला.

यावेळी ज्येष्ठ नागरीक समन्वय समितिचे पदाधिकारी माजी नायब तहसीलदार किसनराव वहिले, बारकू ढोरे,अविनाश कुडे, बाळकृष्ण ढोरे, चंद्रकांत राऊत, मनोहर बागेवाडी, लक्ष्मण ढोरे व राऊत‌ परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Pisces : Annual Horoscope 2022-23 – वार्षिक राशी भविष्य – मीन : वडिलोर्जित मालमत्तेची कामे मार्गी लागतील

याप्रसंगी किनारा वृध्दाश्रमाच्या (kinara Vruddhashram) प्रमुख विश्वस्त प्रीती वैद्य यांनी संस्थेच्या कार्याची व तेथील वृध्दांची माहीती दिली. वृद्धाश्रमात स्त्रिया-पुरूष एकूण 75 जण आहेत.समाजातील अनेक व्यक्ती व संस्था यासाठी सहाय्य करतात. यावेळी आश्रमात राऊत परिवाराकडून दुपारचे भोजन देण्यात आले.

याप्रसंगी तालुका समन्वयक नितीन भांबळ, व्याख्याते विवेक गुरव, प्राचार्य अल्पना मोहंता यांनी मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या कार्याचा गौरव करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष अतुल राऊत यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.