Vadgaon Maval : राजीवभाई आरोग्य मंदिरतर्फे शनिवारी राजीव दीक्षित प्रेरणा दिन

एमपीसी न्यूज- राजीवभाई आरोग्य मंदिरतर्फे शनिवारी (दि. 1) माऊ , ता. मावळ येथे राजीव दीक्षित प्रेरणा दिन आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राजीवभाई आरोग्य मंदिरतर्फे देण्यात आली आहे.

हा कार्यक्रम राजीवभाई आरोग्य मंदिर, मु.पो. माऊ, ता. मावळ, जि. पुणे या ठिकाणी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ संगणक तज्ञ् डॉ विजय भटकर, ह.भ.प. श्रीराम महाराज झिंजुर्के, अभय भंडारी, बीव्हीजी ग्रूपचे दत्ता गायकवाड, अॅड. श्रीमती कमलेश जैन, अॅड.पोपटराव तांबे पाटील, अॅड. रवी यादव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या निमित्त मोफत आरोग्य तपासणी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.

यामध्ये गोसेवक कु. प्रमिलाताई ढगे, बीजसंवर्धन करणारी संस्था याहामोगी माता बियाणे समिती, बांबू संवर्धन करणारे विनय कोलते यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजीवभाई आरोग्य मंदिरतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.