Vadgaon Maval : टाकवे येथे आजपासून श्री रामकथा महोत्सव

टाकवे बुद्रुक येथील कै.आत्माराम विठोबा असवले व रामदास विठोबा असवले यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त रामायणाचार्य हभप रामरावजी ढोक महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून आज, गुरुवार दि. 20 फेब्रुवारी पासून 24 फेब्रुवारी दरम्यान श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. रामकथेचे श्रवण सायंकाळी सहा ते नऊ यावेळत भाविकांना होणार आहे.

पाच दिवसात अनुक्रमे प्रत्येक दिवशी रामजन्म कथा, सीतास्वयंवर, श्रीराम वनवास, लंका दहन, रावणवध, श्रीराम राज्यभिषेक या विषयांवर ढोक महाराज कथा सांगणार आहेत.

टाकवे (बुद्रुक) येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पंचक्रोशीतील सर्वानी रामकथा महोत्सवाचा उपस्थितीत राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक ग्रामविकास समिती अध्यक्ष राजाराम असवले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.