Vadgaon Maval : कान्हे येथे 55 लाखाच्या निधीतून होणार बुद्धविहाराचे नूतनीकरण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कान्हे बुद्धविहाराच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार सुनील शेळके यांच्या विकासनिधीतून 10 लाख, जिल्हा परिषदेचे सदस्य बाबूराव वायकर यांच्या निधीतून 10 लाख व ग्रामपंचायत निधीतून 35 लाख अशा एकूण 55 लाख निधीतून बुद्धविहाराचे नूतनीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.

कान्हे येथे सुमारे 55 लाख रुपये खर्चातून नूतनीकरण करण्यात येणाऱ्या बुद्धविहार इमारतीच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. अनिरुद्ध बनेते थेरो, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबूराव वायकर, पंचायत समितीच्या सभापती ज्योती शिंदे यांच्या हस्ते व सरपंच विजय सातकर, उपसरपंच आशा सातकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी स्वाभिमानी रिपाइंचे अध्यक्ष बबनराव ओव्हाळ,वंचित आघाडीचे प्रकाश गायकवाड, संतोष लोखंडे, रुपेश गायकवाड, प्रकाश आगळमे, संतोष जांभुळकर, संतोष शिंदे, नागेश ओव्हाळ, किशोर सातकर, मदन शेडगे, दिनकर सातकर, बंडोबा सातकर, नंदा सातकर, सागर येवले, कुणाल ओव्हाळ, शांताराम सातकर बाळकृष्ण टपाले आदी उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके यांच्या विकास निधीतून 10 लाख, जिल्हा परिषदेचे सदस्य बाबूराव वायकर यांच्या निधीतून 10 लाख व ग्रामपंचायत निधीतून 35 लाख अशा एकूण 55 लाख निधीतून बुद्धविहाराचे नूतनीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत सदस्य गिरीश सातकर, किशोर सातकर, महेश सातकर, सोपान धिंदळे, बाबाजी चोपडे, संदीप ओव्हाळ, आरिफ मुलाणी, अश्विनी शिंदे, सोनाली सातकर, मनीषा ओव्हाळ, रुपाली कुटे, रोहिणी चोपडे, सुजाता चोपडे, सुनीता चोपडे आदींनी नियोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.