Vadgaon Maval : धोकादायक वळणांवर बहिर्वक्र आरसे

एमपीसी न्युज – वडगाव शहरातील वाढती वर्दळ आणि वाहनांची संख्या लक्षात घेत शहरातील संभाव्य 10 अपघाती धोकादायक वळणांवर (Vadgaon Maval) बहिर्वक्र आरसे (road safety mirror) बसविण्यात आले. शहर भाजपा व पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत भाजपाचे स्वीकृत नगरसेवक शंकर भोंडवे यांच्या संकल्पनेतून याबाबत चर्चा करून हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रातिनिधिक स्वरूपात यापैकी सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह वळणावरील बहिर्वक्र आरशाचे अनावरण भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते व जेष्ठ नेते सोपानराव ढोरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर , माजी सभापती रेवती वाघवले, शहराध्यक्ष अनंता कुडे, बंडोपंत भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते नारायण ढोरे, कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे, संघटनमंत्री किरण भिलारे, सरचिटणीस कल्पेश भोंडवे,सोमनाथ काळे,दीपक बवरे, विठ्ठल घारे , रामचंद्र भिलारे, गटनेते,नगरसेवक दिनेश ढोरे, माजी सरपंच संभाजी म्हाळसकर,मावळ भाजपा कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे,नगरसेवक दिलीप म्हाळसकर, नगरसेविका अर्चना म्हाळसकर, माजी नगरसेवक शामराव ढोरे ,रविंद्र काकडे,भूषण मुथा, शरद मोरे, खंडू भिलारे, नितीन गाडे,रविंद्र  बा.म्हाळसकर,नामदेव वारींगे, हरीश दानवे,संजय जानेराव, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे , महिला मोर्चा अध्यक्षा धनश्री भोंडवे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष दिपक भालेराव, संतोष म्हाळसकर, रमेश ढोरे, शेखर वहिले, ॲड.पवन भंडारी, अमोल ठोंबरे, कुलदीप ढोरे , रविंद्र अ.म्हाळसकर, अभिषेक भोंडवे,सुमन खेंगले , संगीता खेंगले, संतोष भालेराव, महेश खेंगले , पोलीस बांधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Hockey Compition : लॉयला, सेंट जोसेफ अंतिम फेरीत

वडगाव शहरातील श्रीमंत महादजी शिंदे पुतळ्यापासून माळीनगरकडे जाणारा रस्ता,मिलिंद नगर चौक, महावितरण कर्मचारी पतसंस्था कार्यालय,महादेव मंदीरासमोरील वळण,(Vadgaon Maval) टेल्को कॉलनी कडे जाणारा रस्ता, दिग्विजय कॉलनी, खंडोबा मंदिर चौक इत्यादी ठिकाणी हे बहीर्वक्र आरसे बसविण्यात आले आहेत.

मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते नारायणराव ढोरे , गटनेते दिनेश ढोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नगरसेवक शंकर भोंडवे यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाची माहिती दिली. शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी प्रास्ताविक केले. रविंद्र बा. म्हाळसकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक रवींद्र काकडे यांनी आभार मानले.

https://youtu.be/VagjfKFuG8Y

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.