Talegaon Dabhade : इंदोरीत कार्तिकी एकादशीनिमित्त ज्ञान दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – प्रगती विद्या मंदिर व आ. ना. काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज (Talegaon Dabhade) कार्तिकी एकादशी निमित्त प्रशालेच्या परंपरेप्रमाणे शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बरोबर इंदोरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, इंदोरीतील सर्व मित्र मंडळे यांच्या सर्वांच्या सहकार्याने उत्साहपूर्ण अशा आनंदाच्या वातावरणामध्ये ज्ञान दिंडी सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी पालखीचे पूजन माजी सरपंच प्रशांत भागवत, त्यांच्या पत्नी मेघा भागवत, विजय शिंदे,दामोदर शिंदे, प्रवचनकार हभप ज्ञानेश्वर महाराज लिपणे देहू यांचे हस्ते करण्यात आले. सुरुवातीलाच विद्यार्थ्यांनी व काही अध्यापकांनीही अभंग, भजन, गौळणी सादर केल्या.

प्रभात प्रसंगी हभप ज्ञानेश्वर महाराज लिपणे यांचे (Talegaon Dabhade) विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर प्रवचन संपन्न झाले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य सुदाम वाळुंज, पर्यवेक्षक राजेंद्र वाजे, शिक्षक प्रतिनिधी लक्ष्मण मखर, सांस्कृतिक विभाग प्रमुख दिलीप पोटे व रुपेश शिंदे,अलका आडकर, गजभिव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा वारकरी वेश, लेझीम पथक, तुळशी वृंदावन घेतलेल्या मुली, भगवी पताका घेतलेले विद्यार्थ्यांचे पथक यामुळे शाळेचा संपूर्ण परिसर, भक्तीमय झाला होता. संपूर्ण शिक्षक वृंद कर्मचारी ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अतिशय सुरेल आवाजात वारकरी सांप्रदायाचे वारसा जपणारे अभंग व गवळणी सादर केल्या. दिंडी शाळेतून निघून ग्राम प्रदक्षिणा करून मारुती मंदिरासमोरील मोकळ्या मैदानात आल्यानंतर गोल रिंगण झाले. त्यामध्ये लेझीम प्रात्यक्षिके, मनोरे, अभंगाच्या तालावर नृत्य, फुगडया यामुळे संपूर्ण इंदोरी गाव भक्तीमय झाले होते.

Kiwale News : खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, सुदाम शेवकर, माजी सरपंच दशरथ ढोरे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ (Talegaon Dabhade) वामन ढोरे, दगडे गुरुजी व अनेक ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. दिंडीचा समारोप पांडुरंगाच्या मंदिरात आरतीने झाला. याप्रसंगी प्रशांत भागवत यांनी चिवडा, साजिद इनामदार व सिद्दीक मुलानी यांनी सर्व विद्यार्थ्यांना केळी व राजगिरा लाडू यांचे वाटप केले.

प्राचार्य सुदाम वाळुंज, पर्यवेक्षक राजेंद्र वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली रुपेश शिंदे, दिलीप पोटे, लक्ष्मण मखर,संजय खराडे, संतोष कदम, विजय वरघडे, ज्योती पिंजण, स्वाती गाडे, मोहिनी ढोरे, अनिता आगळमे, अलका आडकर, शोभा कदम, अश्विनी शेलार, रेखा भेगडे,स्वेता मोहिते, स्वाती शेवकर, मधुरा चव्हाण, काळे, मोहोळ मॅडम,कदम मॅडम, दिलीप हेरोडे, सुमती शिंदे, गुलाब ढोरे, शुभम कांबळे, शोभा निंबळे, मान्यवरांच्या अथक परीश्रमामुळे दिंडी सोहळा उत्साहपूर्ण व नियोजनबद्ध रीतीने पार पडला. गावकऱ्यांच्या वतीने शाळा सांस्कृतिक वारसा जपत असल्यामुळे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले.

यावेळी प्रशालेच्या भव्य व्यासपीठावर इंदोरी येथील कु. सोनल भागुजी खांदवे यांची महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन संपूर्ण महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम आल्याबद्दल व त्यांची सहाय्यक निरीक्षकपदी नेमणूक झाल्यामुळे प्रशालेच्या वतीने भव्य सत्कार घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.