Vadgaon Maval : महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अ‍ॅड. मच्छिंद्र घोजगे

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. मच्छिंद्र शंकर घोजगे यांची महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

पुणे येथील हाॅटेल किमयामध्ये रविवारी (दि 1) झालेल्या महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनच्या कमिटी मिटींगमध्ये महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराम जोशी, नाशिक जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. कैलास पाटील, महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. ज्ञानेश्वर केदारी व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली.

नाेटरी संदर्भातील त्यांचे योगदान, त्याबाबत दखल घेऊन महाराष्ट्र राज्य नाेटरी संघटनेने त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली.

अ‍ॅड. मच्छिंद्र घाेजगे हे २८ वर्षापासून वकिली व्यवसाय करीत असून त्यांनी ५ वर्ष पुणे जिल्हा नाेटरी अध्यक्षपद भूषविलेले आहे, वडगाव मावळ बार असोसिएशनचे उपाध्यक्ष व राेटरी क्लब ऑफ तळेगांव एमआयडीसीचे अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली आहे. भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष व आंबी ग्रुपग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

अ‍ॅड. घोजगे हे सामाजिक, कला, क्रीडा,शैक्षणिक, राजकीय, सहकार आदी क्षेत्रांशी संबंधित आहेत. नाेटरी वकिलांना येणाऱ्या अडचणी, नाेटरीचा एखाद्या गुन्हयाशी संबंध नसताना सह आरोपी करणे इत्यादी कारणांसाठी नाेटरींची बाजु मांडणार असल्याचे अ‍ॅड. घोजगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

अ‍ॅड. घोजगे यांच्या निवडीबद्दल सोमवार दि.2 मार्च वडगाव मावळ येथील वडगाव मावळ बार असोसिएशनच्या वतीने वडगाव मावळ न्यायालयात सिनियर डिव्हिजनचे न्यायाधीश पी. जी. देशमुख, दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस ए मुळीक, सह न्यायाधीश गुणारी व गायकवाड साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यावेळी वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. तुकाराम काटे सह सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.