Vadgaon Maval : वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलांनी बांधली दवणेवाडी स्मशानभूमीत पाण्याची टाकी

एमपीसी न्यूज- आंदर मावळ (माऊ) येथील दवणेवाडीतील सहादु गोविंद दवणे यांचे नुकतेच निधन झाले. सोमवारी (दि 15) त्याचा दशक्रिया विधी होता. या दिवशी त्यांची दोन मुले विलास दवणे व बाबाजी दवणे यांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन मुलांनी दवणेवाडीतील स्मशानभूमीत पाण्याची टाकी बांधून व वृक्षारोपण करून मावळ मधील जनतेसमोर चांगला आदर्श निर्माण केला आहे.

दशक्रिया विधी दरम्यान असा उपक्रम आदर्श असून अशी समाजोपयोगी कामे करायला हवीत अशा प्रकारच्या भावना नारायण ठाकर, शांताराम लष्करी, माऊली तळावडे आदींनी श्रद्धांजली वाहताना व्यक्त केल्या. गणेशमहाराज जांभळे, चंद्रकांत सदावर्ते व आनंदा जगताप यांनी ग्रामस्थांच्या वतीने दवणे परिवाराचे आभार मानले. याप्रसंगी गोपीचंद महाराज कचरे यांचे प्रवचन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.