BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ‘वारी’ माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- आषाढी एकादशी दिवशी “वारी” या आषाढ वारीवरील माहितीपटाचे चित्रीकरण पुण्यात पार पडले. या माहितीपटात वारीचे अंतरंग दाखवण्यात आले आहे. इंद्रायणीच्या तीरावरून माऊली सोबत विठ्ठल भेटीला निघालेला वैष्णवांचा मेळा चंद्रभागेचे वाळवंट तुडवून विठ्ठल चरणी लीन होई पर्यंतचा सगळा प्रवास अतिशय रंजक पद्धतीने या माहितीपटात दाखवला आहे. लवकरच हा माहितीपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या माहितीपटाला वेगळे स्वरूप देण्यासाठी या वारीत स्वतः विठ्ठल भूतलावर अवतरतात आणि ही वारी विठ्ठलाच्या नजरेतून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वारीतली आणि पुणे शहरातली प्रत्येक गोष्ट विठ्ठल आपल्या नजरेने पाहतो आणि त्यावर आपले मत व्यक्त करतो ही संकल्पना असल्याचे निर्माते धनेश कुलकर्णी आणि प्रेम सावंत यांनी सांगितले.

या माहितीपटाची निर्मिती 4k फिल्म्स तर्फे करण्यात आली असून अर्थसहाय पल्लवी कुलकर्णी, पुष्पलता चव्हाण यांचे आहे. माहितीपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रेम सावंत यांचे असून विवेक करळे कार्यकारी निर्माते आहेत. मनीषा राहणे यांनी रंगभूषेची जबाबदारी पार पाडली असून युवा कलाकार राजवीर पाटील यांनी विठ्ठलाची भूमिका केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.