Vadgaon News : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी विरोधी विधेयकाचा मावळ तालुका काँग्रेस आय कमिटीच्या वतीने निषेध 

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधी विधेयक मंजूर करून शेतकरी वर्गावर अन्यायकारक लादण्यात आलेल्या धोरणाचा मावळ तालुका काँग्रेस आय कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

भाजप सरकारने लोकशाही पायदळी तुडवत मंजूर केलेल्या काळ्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे तसेच हमीभाव आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द केल्या जाणार नाही याची कायदेशीर हमी द्यावी.  या चुकीच्या विधेयकास विरोध करण्यासाठी आज तहसिलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी मावळ तालुका काँग्रेस आय अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, अनंता लायगुडे, गणेश काजळे, विजय काशीद, दिलीप ढमाले, संभाजी लेंडकर, गोरख ढोरे, सतिश ढोरे, अनिस तांबोळी, युवराज ढोरे, अतुल ढोरे, विशाल जाधव आदी जण उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.