Vadgaon News : जुनी चाफेची शाळा पाडण्यास सुरुवात; माजी विद्यार्थ्यांकडून शाळा इमारतीचे पूजन

एमपीसीन्यूज : पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती व शाळेचे माजी विद्यार्थी बाबुराव वायकर यांनी वडगाव येथील जि. प. शाळेच्या इमारतीच्या जागेवर जिल्हा परिषदच्या फंडातून 4 कोटी 81 लक्ष रुपये मंजूर करून व्यापारी संकुल बांधण्यास मंजुरी मिळवली आहे. त्यासाठी ही जुनी इमारत पडण्यास सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी या जुन्या शाळा इमारतीची एक आठवण म्हणून शाळेची पुजा करण्यात आली.

80 वर्षांची इमारत आज भुईसपाट होणार असून तिची आठवण गावातील माजी विद्यार्त्यांना कायम स्मरणात राहावी म्हणून ही पूजा करण्यात आली.

वडगावचे माजी सरपंच माजी व शाळेचे माजी विद्यार्थी सोपान म्हाळसकर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कोलते गुरुजी, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, अरुण चव्हाण, गंगाराम ढोरे, सुरेश कुडे, नगरसेवक राजेंद्र कुडे, माजी उपसरपंच विशाल वहिले, सुनील दंडेल, सुनील चव्हाण, अक्षय रौधळ, केवल ओसवाल,आनंद बाफना, बाळकृष्ण ढोरे, नगरसेवक किरण म्हाळस्कर, लक्ष्मण ढोरे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पंचायत समिती बांधकाम खात्याचे अधिकारी कानडे, बांधकाम अधिकारी-पाटील यांच्या उपस्थितीत जुनी शाळा इमारत पाडण्याचे काम सुरु करण्यात आले. शाळेची शेवटची आठवण म्हणून सर्व माझी विद्यार्थी, शिक्षक कृतज्ञ भावनेने येथे एकत्र येऊन शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला.

याप्रसंगी सोपानराव म्हाळस्कर यांनी वडगाव ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त करून सभापती बाबुराव वायकर यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.