Vehicle Theft : वाहन चोरट्यांचा उच्छाद ; भोसरी, निगडी, वाकडमधून तीन वाहने लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी शहरात वाहन चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. भोसरी आणि वाकडमधून प्रत्येकी एक दुचाकी आणि निगडीमधून एक रिक्षा चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 8) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भोसरीमधील शिवगणेश नगरमधून 15 हजारांची दुचाकी चोरीला गेली. हा प्रकार 23 जूनला रात्री 10 ते 24 जून सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत घडला.

किसन तात्याराव बिरादार (वय 38, रा. शिवगणेश नगर, धावडेवस्ती, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीचा दुसरा प्रकार सेक्टर 24, निगडी -प्राधिकरण येथे बुधवारी (दि. 7) दुपारी अडीच ते पावणेचार वाजताच्या कालावधीत घडला. मुस्ताक हुसेन सय्यद (वय 45, रा. सेक्टर 24, निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सय्यद यांची 70 हजार रुपये किमतीची रिक्षा (एम एच 14 / सी यु 1623) अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा त्यांच्या घरा जवळून चोरून नेली.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीचा तिसरा प्रकार डांगे चौकाजवळ दत्त मंदिर रोडवर असलेल्या सार्वजनिक पार्किंगमध्ये गुरुवारी (दि. 8) दुपारी घडला. विपुल डेविड गडकर (वय 27, रा. खडकी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गडकर यांची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 12 / पीयु 7471) अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता चावीसह चोरून नेली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.