MPC News Vigil : तुमची वाहने भंगारात तर गेली नाहीत ना!

मागील सहा वर्षात शहरातून 6 हजार 666 वाहने गेली चोरीला

एमपीसी न्यूज – शहरातून मोठ्या प्रमाणात वाहने (MPC News Vigil) चोरीला जातात. मात्र ती वाहने सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दरम्यान काही वाहने भंगारात तोडून विकली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अनेक वाहने काही वर्षांचा कालावधी उलटला तरी सापडत नाहीत. त्यामुळे न सापडणारी वाहने भंगारात तर गेली नाहीत ना अशी शंका उपस्थित होत आहे. मागील सहा वर्षात पिंपरी-चिंचवड शहरातून 6 हजार 666 वाहने चोरीला गेल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.

दुकानांसमोर, रस्त्याच्या बाजूला, घर, सोसायट्यांचे पार्किंग, मोकळी मैदाने, दवाखान्याचे पार्किंग अशा प्रत्येक ठिकाणावरून वाहने चोरीला गेली आहेत. मागील सहा वर्षात शहरातून तब्बल 6 हजार 666 वाहने चोरीला गेली असून त्यातील अवघ्या 2 हजार 8 वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित 4 हजार 658 वाहनांच्या बाबतीत गेली कुठं घावना, अशी अवस्था वाहन मालकांची आणि पोलिसांचीही झाली आहे.

हिंजवडी येथील एका तरुणाने गाड्यांची आवड म्हणून त्याने ऑटोमोबाईल शाखेतून डिप्लोमा केला. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या दुचाकी गाड्या चोरण्यास सुरुवात केली. एका गाडीचे पार्ट दुसऱ्या गाडीला लावायचे, नंबर प्लेट बदलायची, रंग बदलायचा आणि गाडी वापरायची. तर काही गाड्यांचे स्पेअर पार्ट काढून ते भंगारात विकत असत. या चोराकडून एक कार, 13 दुचाकी आणि काही वाहनांचे इंजिन जप्त केले.

Talegaon Dabhade : ॲड पु वा परांजपे विद्या मंदिरमध्ये गीता जयंती आणि राष्ट्रीय गणित दिवस साजरा

वाढत्या महागाईमुळे नवीन वाहन खरेदी करणे अनेकांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे जुने वाहन खरेदी करण्याला सध्या अनेकजण पसंती देत आहेत. ओळखीच्या व्यक्तींकडून, गॅरेज चालकांकडून, एजंट, ऑनलाईन माध्यमातून जुन्या वाहनांची खरेदी विक्री केली जाते. वाहने खरेदी करताना वाहनांची कंडिशन बघितली जाते. मात्र कमी पैशांमध्ये वाहन मिळत असल्याने कागदपत्रांची खातरजमा करण्याकडे अनेकजण (MPC News Vigil) दुर्लक्ष करतात.

सहा वर्षातील वाहनचोरी –

वर्ष                                चोरीला गेलेली वाहने (सापडलेली वाहने)
2018                             1433 (334)
2019                             1291 (246)
2020                             974 (211)
2021                             1378 (408)
2022                             1590 (365)
2023 (नोव्हेंबर पर्यंत)     1242 (444)

नंतर पोलीस घरी आल्यानंतर आपण खरेदी केलेले वाहन चोरीचे आहे, हे लक्षात येते. अशा प्रकारात चोरीची वाहने खरेदी करणारे नागरिक देखील पोलिसांच्या लेखी चोरीच्या गुन्ह्यात सहभागी होतात. त्यामुळे पडताळणी न करता वाहन खरेदी करणे जोखमीचे ठरू शकते. जुने वाहन खरेदी करताना त्या वाहनांची कागदपत्रे पडताळून पहा. माहितगार व्यक्तीकडे त्याची चौकशी करा. ज्याच्या नावावर वाहन आहे, त्या मालकाशी चर्चा करा. वाहनाच्या नोंदणी क्रमांकावर नियमभंग केल्याबाबत दंड आकारला आहे का, याची खात्री करा. एखाद्याने वाहन चोरी करून ते विकत असेल तर अशा व्यक्तीची माहिती तात्काळ पोलिसांना द्या.

ही खबरदारी घ्या

  • स्टीयरिंग लॉक, क्लच लॉक, ब्रेक लॉक अशी उपकरणे वापरा
  • गाडी पार्क केल्यानंतर लॉक केल्याची खात्री करा
  • वाहनांना सेन्सर अलार्म बसवा
  • वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवा
  • महागड्या वस्तू (पैसे, दागिने, लॅपटॉप, म्युझिक सिस्टीम) वाहनांमध्ये ठेऊ नका
  • वाहन न चालवता अनेक दिवस एकाच ठिकाणी वाहन पार्क करू नका
  • वाहनाचा नंबर वाहनाच्या पुढील आणि मागील भागावर कलरने लिहा
  • वाहनाचा नंबर काचांवर कोरून घ्या
  • सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या ठिकाणी वाहने पार्क करा
  • सोसायटी, घराच्या पार्किंग मध्ये पुरेसा प्रकाश आणि सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, अलार्म बसवून घ्या
  • वाहनाचा विमा काढा
  • सहा वर्षातील वाहनचोरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.