Talegaon Dabhade : ॲड पु वा परांजपे विद्या मंदिरमध्ये गीता जयंती आणि राष्ट्रीय गणित दिवस साजरा

एमपीसी न्यूज – थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त  (Talegaon Dabhade ) राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. तळेगाव दाभाडे येथील ॲड पु वा परांजपे विद्या मंदिरमध्ये राष्ट्रीय गणित दिवस आणि गीता जयंती शुक्रवारी (दि. 22) उत्साहात साजरी करण्यात आली. गीतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

गीता जयंतीच्या निमित्ताने माजी विद्यार्थिनी डाॅ ज्योती मुंडर्गी यांना आमंत्रित करण्यात आले होते.त्यांच्या हस्ते तसेच शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे,पर्यवेक्षिका कमल ढमढेरे, तसेच ज्येष्ठ अध्यापिका अनिता नागपुरे,आरती पोलावर यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन व गीता या ग्रंथाचे पूजन करण्यात आले.

डॉ. ज्योती मुंडर्गी यांनी आपल्या मनोगतात मुलांनी रोजचा अभ्यास कसा करावा तसेच गीतेमधील काही बोधातून अन्यायाविरुद्ध लढत असताना आपल्यावर अन्याय होणार नाही तसेच कोणतेही नियत कर्म करत असताना प्रामाणिकपणे राहा कुठलेही कर्म करत असताना फळाची अपेक्षा करू नका हे गीतेचे महत्त्व सांगितले. त्याच प्रकारे डॉ अब्दुल कलाम,कृष्णा व सुदामा यांच्या काही गोष्टी सांगून तसेच स्वतःचेही काही अनुभव सांगून आपण केलेल्या कर्माचे फळ कशा पद्धतीने आपल्याला प्राप्त होत असते हे सांगितले. आपण चांगले कर्म करणे किती गरजेचे आहे याविषयी सांगितले.

Talegaon Dabhade : प्रगती विद्या मंदिर व हभप आ. ना. काशिद पाटील ज्यूनिअर काॅलेजमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

सौ पोलावर मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून गीतेचा बारावा अध्याय म्हणून घेतला. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित (Talegaon Dabhade) दिवसाच्या निमित्ताने शाळेतील गणित अध्यापक विजय मुळे यांनी गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सर यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका सौ .कमल ढमढेरे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपुरे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाकरिता शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.