Talegaon Dabhade : प्रगती विद्या मंदिर व हभप आ. ना. काशिद पाटील ज्यूनिअर काॅलेजमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज – इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर व हभप आ. ना. काशिद पाटील ज्यूनिअर काॅलेज मध्ये (Talegaon Dabhade) वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात ज्ञानांकुर हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी विज्ञान दालन, कला दालन, रांगोळी दालन व ग्रंथ दालन निर्माण करण्यात आली.

प्रगती विद्या मंदिर व ह.भ.प. आ.ना.काशिद पाटील ज्यूनिअर काॅलेज इंदोरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. ढोल लेझिम पथकाने मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. इंदोरीचे सरपंच शशिकांत शिंदे यांचे शुभहस्ते संमेलन ध्वज फडकविण्यात आला.

सरस्वती पूजन, दिपप्रज्वलन गणित दिनाचे औचित्य साधून रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन, गीता जयंतीचे औचित्य साधून भगवतगीता पूजन करून संमेलनाला सुरूवात करण्यात आली.

या प्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे,भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सोनबा गोपाळे गुरूजी, महेशभाई शहा, व्याख्याते प्रा.प्रदिप कदम,मा.सभापती विठ्ठलराव शिंदे, टेकएक्सपर्ट इंजिनियरींग कंपनीचे कार्यकारी संचालक राजू इंगळे,इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे संचालक यतीन शहा, कृषी उत्पन्न बाजार समितचे संचालक दिलीप ढोरे,मावळ तालुका सरपंच परिषदचे अध्यक्ष सुनील नाना भोंगाडे, जगन्नाथ शेवकर,जयंत राऊत.मा. उपसरपंच प्रशांत भागवत,दिनेश चव्हाण,धनश्री काशिद मा प्राचार्य बबनराव भसे, ग्रामपंचायत सदस्य संदिप नाटक,बेबीताई बैकर, जयश्री सावंत,राजश्री राऊत उपस्थित होते.

Pune : आजपासून तीन दिवस मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर जड व अवजड वाहनांना दुपारी बारा पर्यंत बंदी

विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करून मान्यवरांची दाद मिळवली. ज्ञानाकुंर हस्तलिखिताचे प्रकाशन सचिव संतोष खांडगे यांचे शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी विज्ञान दालन, कला दालन, रांगोळी दालन व ग्रंथ दालन निर्माण करण्यात आली. पाहुण्यांचे शुभहस्ते दालनांची उद्घाटने करण्यात आली.

संस्था अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी विविध (Talegaon Dabhade) विभागांतील उत्तम कामाबद्दल शिक्षक,शिक्षकेतर व विद्यार्थी यांचे अभिनंदन करुन कौतुक केले.पुढील वर्षापासून हस्तलिखिताचे संस्था पातळीवर बक्षिस देण्याचे जाहीर केले.

सुप्रसिध्द व्याख्याते प्रदीप कदम यांनी आपल्या ओघवत्या वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. व उत्तम अभ्यास करून आई वडील, शाळा व देशाचा नावलौकिक वाढवावा असे सांगितले . सर्व मान्यवरांचे शुभहस्ते विद्यार्थ्यांना बौद्धिक व क्रिडा स्पर्धेत क्रमांक मिळविल्याबद्दल रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन संमेलन प्रमुख दिलीप पोटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक कैलास पारधी,पर्यवेक्षक राजेन्द्र वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन प्रमुख दिलीप पोटे,ज्योती पिंजण, मधुरा चव्हाण,शिक्षक प्रतिनिधी मोहिनी ढोरे,सुमती शिंदे, गुलाब ढोरे विद्यार्थी प्रतिनिधी अमोल पाटील, मंगेश राठोड,प्रतिक बोत्रे, दीपक बेंढारी यांनी विशेष प्रयत्न केले.

पाहुण्यांचे स्वागत व सत्कार सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्ष्मण मखर यांनी केले तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका आडकर श्वेता मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक कैलास पारधी यांनी केले बहूसंख्येने पालक वर्ग उपस्थित होता .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व‌‌‌ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.