Pune : आजपासून तीन दिवस मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर जड व अवजड वाहनांना दुपारी बारा पर्यंत बंदी

एमपीसी न्यूज – नाताळच्या सुट्ट्या आल्याने पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune) कारच्या संख्येत मोठी वाढ होते. यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज (दि.23) व उद्या (दि.24) व सोमवारी (दि.25) सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत जड व अवजड वाहनांना पुणे वाहिनीवर बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे वाहतूक अपर पोलीस महासंचालक डॉ. रविंद्र सिंगल यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

नाताळ सणानिमित्त शाळा व महाविद्यालये, सराकरी कार्यालये यांना सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. सलग सुट्टी आल्यानंतर घाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबविण्यात येते व वाहतूक कोंडी संपल्यानंतर जड अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात. मागील वाहतूक कोंडीची परीक्षण केले असता जड अवजड वाहने व कार हे सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत एकत्र आल्यानंतर वाहतूक कोंडी होते.

Maharashtra : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पहाटे 5 वाजेपर्यंत रेस्टॉरंट व रात्री 1 वाजेपर्यंत दारुची दुकाने राहणार खुली

तरी सर्व जड अवजड वाहन मालक/चालक संघटना यांना वाहतूक पोलिसांनी अवाहन केले आही (Pune) की, या तीन दिवशी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी 12 वाजता नंतर सुरू केल्यास आपला प्रवास सुरक्षित व सोयस्कर होण्यास मदत होईल तसेच वाहतूक कोंडी मुळे सदर वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिन चे काम निघणे इत्यादी टळू शकेल तसेच इंधन व वेळची बचत होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.