Wakad : वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक; दहा दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – वाहन चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना वाकड (Wakad) पोलिसांनी थेरगाव येथून अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्या दहा दिवसाची जप्त करण्यात आल्या आहेत.

Nitin Chandrakant Desai : एका भेटीतच नितीन देसाई यांचे एमपीसी न्यूज परिवाराशी झाले होते घट्ट नाते 

कमलेश भागवत परदेशी (वय 22, रा. चिंचवड. मूळ रा. मुपो. लोंढे ता. चाळीसगाव जि. जळगाव), शुभम राजेंद्र निकम (वय 20, रा. चिंचवड. मूळ रा. मुपो. लोंढे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), पुष्पक दिलीप पाटील (वय 23, रा. थेरगाव. मूळ रा. मुपो. लोंढे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), प्रज्वल लालजी भोसले (वय 24, रा. चिंचवड. मूळ रा. मुपो. लोंढे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपयुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिसांचे पथक थेरगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना थेरगाव येथे दोन दुचाकी संशयित दिसल्या. त्यानुसार पोलिसांनी दुचाकिंचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

दुचाकी वरील चौघांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी चोरीच्या असल्याचे उघडकीस आले. दुचाकी वरील चौघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी वाकड, चिखली, येरवडा, पिंपरी, चिंचवड परिसरातून दहा दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून पाच लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाडड, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संदीप गवारी, स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, प्रशांत गिलबीले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडीत यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.