India vs WI : दणदणीत विजयासह भारतीय संघाने विंडीजविरुद्ध जिंकली आणखी एक मालिका

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : तीन सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना 200 धावांच्या मोठया फरकाने (India vs WI) जिंकून भारतीय संघाने विंडीजविरुद्धची मालिका 2/1 अशी जिंकून कॅरेबियन संघावरील आपले मागील 17 मालिकेतले  वर्चस्व कायम ठेवले आहे.

Wakad : वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक; दहा दुचाकी जप्त

त्रिनीदाद येथील ब्रायन लारा मैदानावर झालेल्या या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेतला. भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवानंतरही अनुभवी रोहित आणि विराटला विश्रांती देण्याचा निर्णय घेत, उनाडकट आणि ऋतुराज गायकवाडला अंतिम 11 त स्थान दिले.

शुभमन गील व ईशान किशन  जोडीने शानदार सलामी देत विंडीजविरुद्ध सर्वोच्च सलामी भागीदारीचा विक्रम आपल्या नावावर करताना पहिल्या विकेटसाठी 143 धावांचा नवा विक्रम आपल्या नावावर केला.त्यांनी शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे या जोडीचा 2017 मधे केलेल्या 132 धावांच्या विक्रमाला मागे टाकले.

 दोघेही शानदार खेळत होते, ईशानने आपले या मालिकेतले सलग तिसरे अर्धशतक पूर्ण केले,तर कसोटी आणि पहिल्या दोन सामन्यात काहीशी शांत (India vs WI) असलेली गीलची बॅटही आज चांगलीच तळपली.या जोडीने आक्रमक आणि आकर्षक फलंदाजी करत भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येकडे जाणारा मार्ग सहज सोपा करुन दिला.

Talawade : दरवाजा उघडा ठेवून झोपणे पडले महागात, घरातून लॅपटॉपसह इतर साहित्य चोरीला

ईशान आपले शतक पूर्ण करेल असे वाटत असतानाच तो करियाहच्या गोलंदाजीवर 77 धावा काढून बाद झाला.त्यानंतर खेळायला आला तो ऋतुराज गायकवाड. मात्र त्याला या संधीचा फायदा काही उठवता आला नाही, तो फक्त 8 धावा करून जोसेफच्या गोलंदाजीवर बाद झाला.

त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनने मात्र अतिशय आक्रमक खेळत धावगतीही वाढवली.षटकार चौकार मारत संजूने विंडीज गोलंदाजी चांगलीच विस्कळीत केली. त्याने 51 धावा केल्या. यानंतर शुभमन गील ही आपल्या शतकाजवळ आल्यानंतर 85 धावांवर बाद झाला.

गील अर्धशतकानंतर मोठी खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे,पण आज तरी त्याला तीन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. यानंतर मात्र कर्णधार पंड्याने जबरदस्त खेळत आपले 10 वे अर्धशतक पूर्ण केले.त्याला सुर्यकुमारनेही उत्तम साथ दिली. मात्र तो ही मोठी खेळी करु शकला नाही अन 35 धावा काढुन बाद झाला,पण त्याने दिलेल्या साथीमूळे भारतीय संघाने 350 धावांची मोठी मजल मारण्यात यश मिळवले.

पंड्याने केवळ 52 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकार मारत नाबाद 70 धावा केल्या, ज्यामुळे भारतीय संघाने आपल्या निर्धारित 50 षटकात 5 बाद 351 धावांचे विशाल लक्ष्य विंडीजपुढे (India vs WI) ठेवले.पहिल्या दोन सामन्यात चांगली गोलंदाजी करणाऱ्या विंडीज संघाची गोलंदाजी आज मात्र भारतीय फलंदाजांनी अगदीच किरकोळ ठरवत विशाल धावसंख्या उभारली.

YCM : वायसीएममध्ये जनजागृती करत जागतिक स्तनपान जागृती सप्ताह साजरा

या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना विंडीजच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली.मुकेशकुमारने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत सुरुवातीलाच विंडीज संघाला तीन मोठे धक्के देत भेदक गोलंदाजी केली. त्याने मेयर, होप आणि किंग या तीन दिग्गज फलंदाजांना बाद करून विंडीज संघाची अवस्था 3 बाद 17 अशी केली.

यानंतर कुलदीप यादव उनाडकट यांनीही आपापले हात धुवून घेत विंडीज संघाला चांगलेच खिंडीत गाठले अन मग यावर कळस चढवला तो शार्दुल ठाकूरने.विंडीज संघांची फलंदाजीही आज बहरली नाही.3 बाद 17,5 बाद 44 आणि 8 बाद 88 अशी त्यांची अवस्था झाल्यावर विंडीज संघाला 100 तरी पूर्ण करता येईल का नाही असे वाटत होते मात्र जोसेफ आणि मोतीने केलेल्या उपयुक्त फलंदाजीमुळे विंडीज संघाने 151 धावा करण्यात यश मिळवले असले तरी त्यांना 200 धावांच्या मोठ्या फरकाच्या पराभवाला टाळता आलेच नाही.

ठाकूरने सर्वाधिक 4 बळी मिळवले, तर मुकेश कुमारने तीन गडी बाद केले.विंडीज संघाकडून गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करणाऱ्या मोतीने आज फलंदाजीतले आपले नैपुण्य दाखवताना सर्वाधिक 39 धावा केल्या, तर अथानेजने 32 व जोसेफने 26 धावा केल्या. ठाकूरनेच अखेरचा घाव घालत विंडीजचा 200 धावांनी पराभव करत भारतीय संघाचा आणखी एक मालिका विजय नक्की केला.

सामन्यात सर्वाधिक 85 धावा करून दोन उत्तम झेल घेणारा गील सामनावीर तर मालिकेत सर्वाधिक धावा करणारा ईशान किशन मालिकावीर ठरला.भारतीय संघ विंडीजवर सलग 17 वेळेस मालिका जिंकून आपले वर्चस्व कायम करण्यात यशस्वी झाला आहे,तर विंडीज संघाचे पराभवाचे दशावतार काही संपता संपत नाहीत.

एकेकाळी जागतीक क्रिकेटमध्ये आपला दबदबा दोन शतके कायम ठेवणारा विंडीज संघ यावर्षीच्या विश्व कप स्पर्धेसाठी पात्रही ठरला नाही याचे प्रचंड दुःख कुठल्याही सच्चा क्रिकेटरसिकाला होत आहे,याचे कारण त्यांच्या संघात असलेल्या खिलाडूवृत्ती आणि बेधडकपणे खेळ करण्याची त्यांची शैली.

मुख्य खेळाडूंना लागलेले देश विदेशातल्या भरमसाठ पैसे  देणाऱ्या लीग स्पर्धेचे आकर्षण, क्रिकेट बोर्डाचे अनाकलनीय धोरण आणि युवा पिढीच्या क्रिकेट सोडून इतर खेळाकडे असलेल्या ओढीमुळे विंडीज क्रिकेटचे वाटोळे होत आहे, हे कटू पण सत्य आहे.विंडीज संघात सर्व काही आलबेल होऊन आणि जगभरात त्यांचे पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण व्हावे असे वाटते.

भारतीय संघाने मालिका जिंकली असली तरी त्यांनी केलेल्या अनाकलनीय प्रयोगाने भारतीय संघाने निर्भेळ यश मिळवण्याची हातातली सोन्यासारखी संधी वाया घालवून अव्यवसायिकताच दाखवली असे म्हटले तर त्यात काहीही वावगे ठरणार नाही.

आगामी मायदेशी होणाऱ्या विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघाला आता उर्वरित सामन्यात जास्तीत जास्त संधी मिळवून आपल्या मजबूत स्थानाला अधिकाधिक मजबूत करणेच जास्त (India vs WI) संयुक्तिक ठरेल ,नाही का?

संक्षिप्त धावफलक

भारत 5 बाद 351

गील 85, ईशान 77, सुर्या 35, संजू 51, पंड्या नाबाद 70

शेफोर्ड 73/2, मोती 38/1

विजयी विरुद्ध विंडीज 35.3 षटकात सर्वबाद 151

अथानेज 32,  करियाह 19, जोसेफ 26, मोती नाबाद 39

मुकेश कुमार 30/3, ठाकूर 37/4, कुलदीप 25/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.