Lonavala : निष्पापांचे बळी घेणारे मोकाट; जनतेचे प्रश्न मांडणारे अटकेत

एमपीसी न्यूज : तिवरे धरण फुटून अनेक निष्पापांचे बळी घेणार्‍यांवर अद्याप कोणतीही कारवाई नाही. मात्र, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणार्‍या आमदाराला अटक होते, या घटनेचा आज लोणावळ्यात स्वाभिमानी पक्ष, काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मनसेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

चिपळून जवळील तिवरे धरण फुटून 23 जणांचा जीव गेला. या दुर्घटनेला कारणीभूत असणार्‍यांवर कोणतीही कारवाई न करणार्‍या गृह विभागाने मुंबई गोवा मार्गावरील खड्डयांबाबत मुजोर अधिकारी व सुस्त प्रशासनाला जाब विचारणारे आमदार नितेश राणे यांना मात्र तात्काळ अटक केली. विरोधकांचा आवाज दाबण्याचा सरकारचा डाव असल्याने या घटनेचा लोणावळा शहरात निषेध नोंदविण्यात आला.

काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, शहराध्यक्ष विलास बडेकर, स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष शौकत शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जीवन गायकवाड, मनसेचे शहराध्यक्ष भारत चिकणे, ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे पुणे शहराध्यक्ष विजय पाटसुपे व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.