Chinchwad : दस-याच्या दिवशी 174 नागरिकांकडून प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन

एमपीसी न्यूज – विजया दशमी दस-याच्या दिवशी सीमोल्लंघन केले जाते. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील 174 नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले. याबाबत त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे.

कोरोना साथीच्या काळात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत. त्याचे पालन करणे आवश्यक आहे. नियम न पाळल्यास पोलिसांकडून नागरिकांवर कारवाई केली जात आहे. रविवारी (दि. 25) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (19), भोसरी (9), पिंपरी (28), चिंचवड (2), निगडी (1), आळंदी (28), चाकण (2), दिघी (2), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (8), वाकड (50), हिंजवडी (19), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (5), रावेत चौकी (1), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.