Vishwanath Mahadeshwar : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

एमपीसी न्यूज-मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे काल रात्री ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने (Vishwanath Mahadeshwar) निधन झाले आहे.ते 63 व्या वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल. त्यांनंतर दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा टीचर्स कॉलनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल.

Pimpri : वल्लभनगर आगारात दोन बसमध्ये चेंगरून महिला सहाय्यकाचा मृत्यू

महाडेश्वर सांताक्रूझमधील राजे संभाजी विद्यालयाचे माजी प्राचार्य होते. 2002 मध्ये  पहिल्यांदा ते नगरसेवक पदावर निवडून आले. 2017 ते 2019 काळात मुंबईचे महापौर होते. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवलं.  शिक्षण समितीचे अध्यक्ष (Vishwanath Mahadeshwar) म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. तसेच 2019 ला त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.