Vision Sports : फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद !

एमपीसी न्यूज : व्हिजन स्पोर्टस् सेंटर तर्फे आयोजित ‘व्हिजन करंडक’ (Vision Sports) अजिंक्यपद (14 वर्षाखालील) क्रिकेट स्पर्धेत फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने 2 एन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा 6 गडी राखून पराभव करत स्पर्धेचे विजतेपद संपादन केले.

व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी मैदान, सनसिटी रोड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करताना २एन क्रिकेट अ‍ॅकॅडमीने 30 षटकात 6 गडी गमावून 201 धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये अर्पुव ढगे याने 74 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकारासह 101 धावांची खेळी केली. अर्पुवसह कृष्णा देशमुख (34 धावा) आणि धु्रव कामत (नाबाद 26 धावा) यांनी फलंदाजीमध्ये साथ दिल्याने २एन संघाने दोनशे धावांचा टप्पा गाठला. फल्लाह संघाच्या यश सासणे याने 32 धावात 4 गडी बाद केले.

या आव्हानाला उत्तर देताना फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमीने सावध सुरूवात केली. वेदांत वेलापुरे (नाबाद 57 धावा) आणि यशराज बोरा (नाबाद 59 धावा) या दोघांनी संघाच्या डावाला आकार दिला. अजय यादव यानेही 24 धावांचे योगदान दिले. यांच्या फलंदाजीच्या जोरावर फल्लाह संघाने 29 षटकामध्ये व 4 गडी गमावून आवश्यक धावा पूर्ण करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

तिसर्‍या स्थानासाठीच्या झालेल्या सामन्यात आशय शेडगे याच्या फलंदाजीच्या जोरावर व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी (रेड) संघाने क्रिकेट स्ट्रायकर्स अ‍ॅकॅडमी संघाचा 74 धावांनी पराभव केला.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे मुख्य गणेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि उपविजेत्या 2 एन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात आली.

 

अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकाल : 

२एन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः 30 षटकात 6 गडी बाद 201 धावा (अर्पुव ढगे 101 (74 (15 चौकार, 1 षटकार), कृष्णा देशमुख 34, धु्रव कामत नाबाद 26, यश सासणे 4-32) पराभूत वि. फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमीः 29 षटकात 4 गडी बाद 202 धावा (वेदांत वेलापुरे नाबाद 57 (67, 6 चौकार), यशराज बोरा नाबाद 59 (46, 9 चौकार), अजय यादव 24, प्रियांश पी. 27); सामनावीरः यश सासणे.

तिसर्‍या स्थानासाठी : Vision Sports

व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी (रेड) : 20 षटकात 1 गडी बाद 126 धावा (आयश शेडगे नाबाद 57 (60, 5 चौकार), राजेश आढाव नाबाद 32, श्रेयस लडकत 15) वि.वि. क्रिकेट स्ट्रायकर्स अ‍ॅकॅडमीः 17 षटकात 10 गडी बाद 72 धावा (यशश्री पाटोळे 27, वरद काकडे 11, शादृल नारळकर 3-3, समयंत दिक्षित 2-12, दिक्षित माळी 2-22); सामनावीरः आशय शेडगे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.