Pdfa League : पुणेरी वॉरियर्स, अस्पायर एफसीचे चमकदार विजय

एमपीसी न्यूज  – पुणेरी वॉरियर्स आणि अस्पायर एफसी यांनी चमकदार खेळाचे प्रदर्शन करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर ४ – २ असे विजय मिळवून पीडीएफए लीग फुटबॉल स्पर्धेत आपली आगेकूच कायम ठेवली. 

 

एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या सामन्यात अस्पायर एफसी संघाने वैष्णवी बराटे हिच्या हॅटट्रिकच्या जोरावर कमांडोजचा पराभव केला. वैष्णवीने १५, ४५ आणि ६२व्या मिनिटाला गोल केला.

 

कंमाडोजने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून सामन्याची वेगवान सुरवात केली होती. धनश्री कर्णावत हिने गोल केला. त्यानंतर वैष्णवीने केलेल्या गोलने अस्पायरने बरोबरी साधली. उत्तरार्धात ३६व्या मिनिटाला अंजेला गुट्टल हिने गोल करून अस्पायरला आघाडीवर नेले. वैष्णवीने ही आघाडी ३ – १ अशी केली. त्या वेळी आर्षी वधवानी हिने ५५व्या मिनिटाला गोल करून पिछाडी ३ – २ अशी भरून काढत सामन्यात रंगत आणली. मात्र, अतिरिक्त वेळेत वैष्णवीने निर्णायक गोल करून अ गटातील सामन्यात अस्पायरला विजय मिळवून दिला.

 

त्यापूर्वी, सी गटातील सामन्यात पुणेरी वॉरियर्सने चुरशीच्या लढतीत निलिशा संकेत हिने नोंदविलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर स्निग्मय एफसीचा ४ – २ असा पराभव केला. निलिशाने ३, १२ आणि ३३व्या मिनिटाला आणि सहाव्या मिनिटाला साक्षी बने हिने गोल करून संघाच्या विजयात आपला वाटा उचलला. त्यापूर्वी विसाव्या मिनिटाला निधी वर्मा आणि बिन्सी बाबू यांनी एकेक गोल करून पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला.

 

निकाल –
एसएसपीएमएस मैदान – महिला लिग

 

ब गट – पुणे पायोनिर्स १ (आलिया इनामदार ४७वे मिनिट) वि.वि. उत्कर्ष मंडळ ०

 

सी गट – पुणेरी वॉरियर्स ४ (निलिशा संकेत ३, १२, ३३वे मिनिट, सात्री बने ६वे मिनिट) वि.वि. स्निग्मय एफसी २ (निधी वर्मा २०वे, बिन्सी बाबू ३५वे मिनिट)

 

स्टेप ओव्हर एफए ६ (निशा पर्से ६, १५, १९वे मिनिट, अनुजा क्षीरसागर २३वे मिनिट, आदिती गायकवाड २५वे, कायरा सचदेवा २९वे मिनिट) विवि. रायन एफए ०

 

अ गट – अस्पायर एफसी ४ (वैष्णवी बराटे १५, ४५, ६०+2रे मिनिट, अंजेला गुट्टल ३६वे मिनिटः कमांडोज २ (धनश्री कर्णावत २रे आणि आर्षी वधवानी ५५वे मिनिट)
सप महाविद्यालय मैदान – तृतिय श्रेणी
ब गट – खडकीयन्स ० बरोबरी वि. साई एफए ०

 

गट सी – केशव महादेव प्रतिष्ठान इलेव्हन १ (झिशान शेख ४०वे मिनिट) बरोबरी वि. असोशिएशन पूना सोशल १ (शिशुधन ३३वे मिनिट)

 

ब गट – व्होबा २ (अॅलारिक डायस ३७वे मिनिट, प्रथमेश देडगे ५८वे मिनिट-पेनल्टी) वि.वि. मॅथ्यू एफ ए १ (पृथ्वीराज माने ३५वे मिनिट)

 

ड गट – एफसी पिंपरी-चिंचवड (पुढे चाल) वि. दक्ष एफसी
गट अ – गॅलाक्टिक वॉरियर्स ७ (सनिल रोकडे ७वे मिनिट -पेनल्टी, विवेक नाथ ९वे, फवाद डी १७, २४, ४८वे मिनिट, अजित चव्हाण ४४वे मिनिट) वि.वि. नव महाराष्ट्र ०
अ गट – परशुरामियन्स ब १ (अनिकेत वाकणकर ६०वे मिनिट) वि. वि. एफसी बेकडिन्हो ब ०

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.