Pune News : लोहगाव विमानतळाजवळ आकाशात प्रखर लाईट सोडण्यास बंदी

एमपीसी न्यूज – लोहगाव येथे हवाई दल आणि नागरी विमानांची कायम ये-जा असते. त्यामुळे या भागात रात्री आकाशात कोणीही प्रखर लाईट बीम सोडू नये असे आदेश पुणे पोलीसांनी दिले आहेत, या प्रकारचे लाईट बीम आकाशात सोडल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

 

हवाई दलाने या लाईटबाबत माहिती पोलिसांच्या नजरेत आणून दिली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आज याबाबत आदेश काढून आजपासूनच त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. आकाशात या प्रकारे प्रखर लाईट बीम सोडल्याने वैमानिकांना त्रास होऊन अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात येत होतीय त्यामुळे या विमानतऴाच्या 15 किमी. वायूक्षेत्रात पुणे पोलिसांचा हा आदेश सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत लागू असणार आहे.या आदेशाची अंमलबजावणी दोन महिन्यांसाठी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.