Pimpri News : महापालिका शहर अभियंतापदी मकरंद निकम यांना पदोन्नती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांना शहर अभियंतापदी पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती समितीची आज (गुरुवारी) बैठक झाली. या समितीने निकम यांना बढती दिली आहे. महापालिकेत पहिल्यांदाच पदोन्नती समितीची बैठक झालेल्यादिवशीच आदेश काढला आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी हा आदेश काढला आहे.

शहर अभियंता राजन पाटील 31 मे 2022 रोजी महापालिका सेवेतून निवृत्त होत असल्याने त्यापूर्वीच नवीन शहर अभियंत्याची नियुक्ती करणे आवश्यक होते. त्यासाठी प्रशासनाने आज (गुरुवारी) सायंकाळी पदोन्नती समितीची बैठक झाली.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सह शहर अभियंता मकरंद निकम, अभियंता श्रीकांत सवणे आणि शासनाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीने आलेले स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर शहर अभियंतापदासाठी इच्छुक होते. तिघांनी प्रयत्न केले.त्यात निकम सेवाजेष्ठ होते.

पदोन्नती समितीने सेवाजेष्ठतेनुसार मकरंद निकम यांना 1 जून 2022 पासून शहर अभियंतापदी बढती दिली. त्यांच्या आस्थापना विषयक बाबी स्थापत्य मुख्य कार्यालयात राहतील. या आदेशाची त्यांच्या सेवापुस्तकात नोंद केली जाणार आहे.

दरम्यान, मकरंद निकम यांना शहर अभियंतापदी पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे रिक्त झालेल्या सह शहर अभियंतापदी कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांना 1 जून 2022 पासून पदोन्नती दिली आहे. त्यांच्या आस्थापना विषयक बाबी स्थापत्य मुख्य कार्यालयात राहतील. या आदेशाची त्यांच्या सेवापुस्तकात नोंद केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.