Pune : इंग्लडच्या शिष्टमंडळाची पुणे स्मार्ट सिटीला भेट  

एमपीसी न्यूज – युनायटेड किंग्डमच्या (इंग्लंड) शिष्टमंडळाने अभ्यास दौ-या दरम्यान आज पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पास गुरुवारी भेट देऊन प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली.

पुणे स्मार्ट सिटीच्या कामाला आणखी पुढे नेण्यासाठी तसेच विविध क्षेत्रातील क्षमतेच्या दृष्टिकोनातून स्मार्ट सिटीचे काम प्रदर्शित करणे हा या भेटीचा उद्देश होता. या शिष्टमंडळाने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) हाती घेतलेल्या विविध विकासकामांच्या प्रकल्पस्थळांचा आढावा घेतला.

या शिष्टमंडळामध्ये युकेमधील विविध विकासप्रकल्पांवर काम केलेले सहा वरिष्ठ नेते आणि अधिका-यांचा समावेश होता. शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व हे स्टीव्ह पाउंड, यॉन फॉब, फिलिप हॉलोबोन, लॉर्ड ढोलकीया आणि कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या कार्यालयातर्फे रॉवर्ट हार्पर यांनी केले. पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने मनोजित बोस यांनी या शिष्टमंडळाला प्रकल्पांची माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.