Wakad : वाकड येथे दिव्यांगासाठी आयोजीत मोफत होमिओपॅथी  शिबिरात 59 दिव्यांगानी घेतला लाभ

एमपीसी न्यूज – सप्तर्षी फाउंडेशन,निर्वाण दिव्यांग संस्था व प्रेडिक्टिव्ह (Wakad) होमिओपॅथी पुणे यांच्यातर्फे 2 जुलै रोजी  वाकड योथील श्री.लक्ष्मीबाई बारणे उद्यानात (दिव्यांग) मुलांकरीता 9 वे मोफत होमिओपॅथी उपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिरात 59 दिव्यांग बालकांनी लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे डॉ.रजत मालोकार साहेब,  विजय आहेर सर संचालक, नियोजन विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई), चित्रलेखा राजुस्कर (प्राध्यापिका, कर्वे समाज सेवासंस्था), सप्तर्षी फाउंडेशनचे संस्थापक सचिव .मनोज कुमार बोरसे, सप्तर्षी फाउंडेशनचे प्रशासकीय प्रमुख  रुशाली बोरसे,  ज्योती आघारकर (निर्वाण दिव्यांग संस्था ),

वर्षा (नारी माजी कार्यकर्त्या ), समाजसेविका  विजया माने-सपकाळ, रंजना सुतार या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी तर्फे मुख्य समुपदेशक डॉ. रजत मालोकार, डॉ.सौम्या डॉ.जीविका, डॉ.मयुरी, डॉ.प्रियांका सावके, डॉ.सिमरन, डॉ.स्वाती, डॉ. हनी ओस्वाल, डॉ.प्राजक्ता, डॉ.मुस्कान, डॉ.सात्विक, डॉ.निवेदिता, डॉ.वैष्णवी, डॉ.शिव , डॉ.अंकिता, डॉ.प्रनवी, डॉ. मनीषा, डॉ. धवल, डॉ. प्रियांशी डॉ.शिवानी, डॉ.सौरभ, डॉ.स्नेहल, डॉ. प्रियंका धमाल, डॉ.साईरूपा, डॉ.ओंकार इत्यादी डॉक्टर उपस्थित होते.

हेशिबिर कै.डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच होमिओपॅथीचे जनक डॉ.सम्युयल हनिमन्न यांच्या प्रेरणेने आयोजित केले जाते. कै.डॉ.प्रफुल्ल विजयकर सर यांनी 2005 साली सेवा भावातून विशेष मुलांसाठी महाबळेश्वर येथे चारिटेबल होमिओपॅथिक कॅम्पची सुरुवात केली. आज पर्यंत विजयकर सरांमुळे हजारो विशेष मुलांना निस्वार्थ भावनेतून शास्त्रशुद्ध होमिओपॅथी उपचार घेता आले आहेत.

परंतु त्यांच्या नंतरही प्रेडीक्टीव होमिओपॅथीचे विद्यमान संचालक डॉ अंबरीश विजयकर  व तरंग विजयकर  यांनी ही सेवा अविरतपणे चालू ठेवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. हे शिबिर संपन्न होण्यासाठी प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे पुणे शाखा प्रमुख डॉ.रजत मालोकार  यांनी पुढाकार घेतला.

या कार्यक्रमात “दिव्यांग बांधवांसाठी इंटिग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन” या प्रोजेक्टचे सादरीकरण करण्यात आले. ही संकल्पना भारत सरकार च्या कॉपीराईट विभागाकडून मान्यताप्राप्त असून लवकरच पेटंट कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यात येईल.

या शिबिरासाठी  सोमनाथ मोरणे, रंजना सुतार,  दिशा भटनागर, निशांत गौर, मंगेश सुरवसे, ज्योती आघारकर या दानशूर (Wakad) व्यक्तींकडून आर्थिक सहाय्य मिळाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.