Maharashtra : राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला…. बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडेंसह ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल

एमपीसी न्यूज- गेल्या आठवड्यापासून राज्यातील राजकारणात नवनवीन (Maharashtra) घडामोडी घडत आहे. आजच ठाकरे गटाच्या निलम गोऱ्हे शिंदे गटात सामिल झाल्या;तोपर्यंत काही वेळापूर्वी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाल्याने चर्चांना उधाण आली आहे.बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडेंसह राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या भेटीला  गेले आहेत.

Wakad : वाकड येथे दिव्यांगासाठी आयोजीत मोफत होमिओपॅथी  शिबिरात 59 दिव्यांगानी घेतला लाभ

राज ठाकरे यांची ही भेट पूर्वनियोजित होती, असे सांगण्यात येतआहे.मागील काही मिनिटांपासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.राज्यातील काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याचं बोललं जात आहे. ही भेट  नवी राजकीय समिकरणं मांडणारी असेल की राज्यातील  प्रश्नांवर चर्चा करण्यासाठीची असेल हे लवकरच समजेल ;तूर्तास या भेटीने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली हे मात्र (Maharashtra) नक्की.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.