Wakad : माहेरहून पैसे आणि सोने आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून पाच लाख रुपये आणि 13 तोळे सोन्याचे दागिने आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 जून 2019 ते 26 मार्च 2020 या कालावधीत रहाटणी येथे घडली.

विनायक सदाशिव बेडके (वय 33), शोभा सदाशिव बेडके (वय 65), महेश सुरेश विभूते, पूनम महेश विभूते (सर्व रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी महिलेकडे माहेरहून गाडी घेण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच लग्नामध्ये देणार असलेले 13 तोळे सोन्याचे दागिनेही घेऊन ये, असे म्हणत फिर्यादी यांना मारहाण केली. फिर्यादी आणि त्यांच्या माहेरच्या लोकांना शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.