Wakad : किरकोळ कारणावरून मारहाण; परस्परविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून दोन गटात बेदम मारहाण झाली. याबाबत परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 6) सकाळी जय हिंद कॉलनी, राजवाडेनगर काळेवाडी आणि मेन रोड काळेवाडी येथे घडली.

विनायक उर्फ विकी सुरेश नाईक (वय 22, रा. जयहिंद कॉलनी, राजवाडेनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयुब शेख, इमरान शेख, उस्मान शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयहिंद कॉलनी राजवाडेनगर येथून जात असणाऱ्या बाळू वाघमारे या इसमाला आरोपींनी अडवून शिवीगाळ केली. तसेच पुढे जाण्यास रोखले. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आणि त्यांची आई गेली. आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या आईला शिवीगाळ केली.

याबाबत फिर्यादी विनायक आणि त्यांच्या आई संगीता हे वाकड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी आयुब आणि इमरान या दोघांनी विनायक आणि त्यांच्या आईला कडाप्प्याने मारहाण केली. तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्या घराचे काच फोडून नुकसान केले.

याच्या परस्पर विरोधात आयुब चांद शेख (वय 30, रा. राजवाडेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनायक उर्फ विकी सुरेश नाईक आणि संगिता सुरेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी बाळू वाघमारे हा इसम कॉलनीमधून जात होता. त्यावेळी उस्मान शेख यांनी त्यास कुठे चालला आहे. दारू बंद आहे, असे म्हटले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. फिर्यादी यांनी ती भांडणे सोडवली. याचा जाब विचारण्यासाठी आरोपी आले. त्यांनी आयुब यांना शिवीगाळ केली.

आरोपी संगीता हिने आयुब यांना तू घरी चल तुला दाखवते, असे म्हटले. त्यावर आयुब आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी आरोपीने आयुब यांना लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.