Wakad Crime News : लग्नात हुंडा व सुखवस्तू न दिल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – लग्नात हुंडा व सुखवस्तू न दिल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. याबाबत सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अमोल दत्ताराम शिगवण (वय 30), सुनैना दत्ताराम शिगवण (वय 55), दत्ताराम रामजी शिगवण (वय 60, सर्व रा. तापकीरनगर, काळेवाडी ), दीपा संजय रांगले (वय 33, रा. बोपखेल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 25 वर्षीय विवाहितेने 23 फेब्रुवारी 2021 रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 11 फेब्रुवारी 2017 ते 6 मे 2019 या कालावधीत घडला आहे. आरोपी पती अमोल याने विवाहितेला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

विवाहाच्या लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा व सुखवस्तू दिल्या नसल्याच्या कारणावरून अन्य आरोपींनी संगनमत करून टोचून बोलून तसेच तिला मुलबाळ होत नसल्याने नांदवणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.