Nashik Corona Update : शहरात एकूण 424 रुग्णांची वाढ तर 243 रुग्णांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – नाशिक शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज जिल्ह्याभरात एकूण 424 रुग्णांची वाढ झाली असून दोन रुग्णांचा करोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर 243 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत करोनाची लाट बघायला मिळाल्यानंतर नाशिकमध्येही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री पोलिसांकडून ठिकठिकाणी तपासणी सुरु आहेत. त्यातून नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी समजदेखील दिली जात आहे.

आज नाशिक जिल्ह्यात वाढलेले सर्वाधिक रुग्ण हे नाशिक महापालिकेच्या आवारातील आहेत. तब्बल 260 रुग्ण आज येथे आढळून आले आहेत. त्या पाठोपाठ नाशिक ग्रामीणमध्येही आज रुग्णांचा आकडा वाढला असून 131 रुग्ण आज याठिकाणी आढळून आले आहेत.

मालेगाव महापालिका क्षेत्रातदेखील 25 रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्हाबाह्य 8 रुग्ण वाढलेले आहेत.

आज दोन रुग्णांचा करोना संसर्गाने मृत्यूदेखील झाला असून एक रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील तर दुसरा रुग्ण नाशिक ग्रामीणमधील असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.