Wakad : किरकोळ भांडणातून घरातील सामानाची तोडफोड

एमपीसी न्यूज – किरकोळ भांडणातून घरातील सामानाची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी (दि. 6) दुपारी दीडच्या सुमारास पवनानगर, काळेवाडी येथे घडली.

लता नाना शेवरे (वय 46, रा. पवनानगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कल्पना शांताराम काकुळदे (वय 44), आकाश काकुळदे, निलेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि अन्य एक जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या घरात घुसले आरोपी आणि तीचा मुलगा आकाश काकुदळे याने तुझ्या मुलांनी माझ्या वडीलांना मारहाण केली मी तुम्हाला पाहून घेईन असे म्हणत घरातील टिव्ही, सोफा, फ्रीज यांची तोडफोड केली. बघून घेण्याची धमकी देत आरोपी घरातून निघून गेले. यामुळे परिसरात काही काळ दहशत पसरली होती. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.